मिथुन

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही आज ज्या जागी आहात त्यात तुमच्या नशीबापेक्षा तुमच्या मेहनतीचा जास्त राेल आहे. यामुळे सारे काही नशीबावर साेपवू नका.उलट मेहनतीला महत्त्व द्या. त्यावर विश्वास ठेवा. या आठवड्यात तुमचे लक्ष भरकटवणाऱ्या अनेक गाेष्टी येतील पण तुम्ही ठाम राहायला हवे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात श्रमाला काेणताही पर्याय नाही. ही गाेष्ट तुमच्यापेक्षा जास्त काेण जाणते. या आठवड्यात याबाबत तुमच्यावर भार जास्त असेल. पण तुम्ही यशस्वीपणे तुमची कामे पूर्ण कराल. त्यासाठी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा हाेईल. जर व्यवसायी असाल तर सध्या नव्या प्राेजेक्टचा विचार करू नये.
 
नातीगाेती : कधी कधी नात्यांमध्येही तुम्ही अत्यंत कॅलकुलेटिच्ह हाेत असता.केव्हा पुढे जायचे व केव्हा मागे हटायचे तुम्हाला व्यवस्थित माहीत असते. पण या आठवड्यात डाेक्याने नव्हे तर मनापासून तुमची नाती जाेपासा. नक्कीच याचा अत्यंत चांगला प्रभाव तुम्हाला जाणवेल. त्यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही.
 
आराेग्य : सतत उद्भवणाऱ्या समस्यानंतरही तुम्हाला आराेग्य हेच माेठे धन आहे हे समजत नाही. तुमच्या कामाच्या व्यापातून थाेडा वेळ काढून स्वत:च्याफिटनेसवरही लक्ष द्या. सकाळीफिरणे व व्यायाम तुमच्या दिनचर्येत सामील करा.जेणेकरून हृदयासंबंधित आजारांपासून स्वत:ला दूर ठेवू शकाल.
 
शुभदिनांक : 12, 15, 16
 
शुभरंग : पांढरा, पिवळा, जांभळा
 
शुभवार : गुरुवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : कशीही परिस्थिती असली तरी स्वत:वरील विश्वास गमावू नका व स्वत:ला सांगा की आपण हे करू शकताे.
 
उपाय : गुरुवारी जरी उपवास करीत नसाल तरी मीठाचा वापर अजिबात करू नका. श्रीविष्णूला ज्या फळांचा नैवेद्य दाखवाल ती गरिबांना दान करा. या गुरुवारी लक्ष्मी-नारायणाची एकत्रित पूजा अवश्य करा