प्रत्येक माणसाला ध्यानाची गरज आहे.वर्तमान क्षणात जगणेच ध्यान आहे. पूर्णपणे विश्रांती घेणेच ध्यान आहे. जेव्हा आपण पूर्णपणे प्रसन्न हाेता, प्रेमाने ओतप्राेत हाेता तेव्हा ध्यान आपाेआपच हाेते. ध्यान एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये सारे विचार थांबतात आणि मन पूर्णपणे विश्राम स्थितीत पाेहाेचते. ध्यानात गरज आहे अनाैपचारिक आणि विश्रामात राहण्याची.ध्यान करावयाचे, असा विचार करू नका - एक प्रश्न आला की, ध्यान करताना मनात खूप सारे विचार येतात. वास्तविक मन भटकत नसते. मन नेहमी आणखी काही मिळवण्याची इच्छा बाळगत राहते.काही मिळवण्याची इच्छाच आपल्याला आपल्या ‘स्व’च्या सर्वाेच्चपदी बसवेल.
आपल्या ‘स्व’ची फक्त एक झलक आपल्यला पुढे जाण्यास खूप मदत करते.आता आपण आपले मन भटकत आहे याविषयी तर सावध झाला आहात. ही जागरूकता हाेणेही खूप माेठी गाेष्ट आहे.इच्छा आपल्याला आपल्यापासून दूर नेऊ इच्छितात. छाेट्या छाेट्या इच्छा आपले ‘ध्यान’ भंग करू शकतात.जेव्हा आपण ध्यानासाठी बसता, तेव्हा आपण ही तीन सूत्रे पाळायची आहेत.पहिले सूत्र ‘मला काहीही नकाे’ दुसरे सूत्र ‘मला काहीही करावयाचे नाही’ आणि तिसरे व अंतिम सूत्र हे की, ‘मी काहीही नाही.’ आपल्याला ध्यान करावयाचे आहे, असा विचार करू नका. आपल्याला यासाठी काेणतेही कृत्य करावयाचे नाही. फक्त बसा आणि आतून रिकामे व्हा.ध्यानात जाण्यासाठी ही तीन सूत्रे अत्यंत आवश्यक आहेत.