हवामान बदलामुळे व्हेल माशांच्या संख्येत घट

    13-Sep-2021
Total Views |
 
 

dolphin_1  H x  
 
उत्तर अटलांटिकमधील व्हेल माशांची संख्या धाेक्यात आली आहे. गल्फ ऑफ माइनमधील पाण्याची उष्णता वाढल्यामुळे व्हेल्सची संख्या कमी हाेत चालली आहे. हवामान बदलामुळे व्हेल माशांच्या अन्नाचा स्राेत असलेले फॅटी क्रस्टेशिअन्स नष्ट हाेत चालले आहे. त्यामुळे मादी व्हेल्सची पुनरुत्पादनाची क्षमता कमी झाली आहे, असे संशाेधन ‘ओशनाेग्राफी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
हवामान बदलामुळे मादी व्हेल माशाची गर्भधारणा हाेण्याची, गर्भ वाढवण्याची आणि पिल्लाची काळजी घेण्याची क्षमता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हेल माशाच्या उत्पादनाचे प्रमाण गेल्या आठ वर्षांत लक्षणीयरीत्या घटले आहे, अशी माहिती सागरी अभ्यासक एरिन मेयर-गटब्राॅड यांनी दिली.
 
2018च्या प्रारंभापासून तर राइट व्हेल मासा जन्मालाच आलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.सेंट लाॅरेन्स आखातात सन 2015मध्ये व्हेल माशांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली हाेती. कदाचित त्यामुळेच व्हेल मासे आपल्या अन्नाचा इतरत्र शाेध घेत असावेत. मात्र, पर्यावरणातील नव्या बदलांमुळे धाेका वाढला आहे. गेल्या दशकभरात व्हेल माशांच्या उत्पादनात घट झाल्याने आता पृथ्वीवरील उत्तर अटलांटिक राइट व्हेल माशांची संख्या केवळ 356 झाली आहे. त्यामुळे या माशांचा धाेक्यात आलेल्या प्रजातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. माशांच्या अन्य प्रजाती वातावरण बदलातही कशा तग धरून आहेत, याचा अभ्यास करायला हवा, असे मत एरिन यांनी व्यक्त केले आहे.