ॠषिपंचमीला निनादले ‘ओम नमस्ते गणपतये...’ चे स्वर

13 Sep 2021 16:47:13
 
दगडूशेठ ट्रस्टतर्फे अथर्वशीर्ष पठण : हजाराे भाविकांचा ऑनलाइन सहभाग
 

dagdusheth_1  H 
 
‘ओम नमस्ते गणपतये...’चे स्वर ऋषिपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमाेर निनादले. दरवर्षी हजाराे महिलांच्या उपस्थितीत हाेणारा साेहळा, यंदा सलग दुसऱ्या वर्षी दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या 5 महिलांच्या उपस्थितीत पार पडला, तर हजाराे भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या साेहळ्यात भाग घेतला.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयाेजिण्यात आला हाेता.यंदाही मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांचीच उपस्थिती हाेती. शुभांगी भालेराव यांच्यासह अर्चना भालेराव, जयश्री शेळके, प्रेरणा देशपांडे, ज्याेती देशमुख, स्नेहा परांजपे या 5 महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे भाग घेतला.
 
या पाच महिला सलग 12 वर्षे या उपक्रमात भाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे 35 वे वर्ष आहे. अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी सहाला शंखवादनाने झाला. ओमकार, गणेश वंदना, दाही दिशांनी तम लाेपवा प्रथमेशा जग जागवा... हे गीत सादर झाले.
त्यानंतर गजर व आरती झाली. मंदिरात उपस्थित महिलांसह ऑनलाइन पद्धतीने उपस्थित भाविकांनी श्री गणरायाचरणी अथर्वशीर्ष पठण केले.उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी हाेणार आहेत. मंदिराबाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ स्वीकारले जाणार नसून, प्रसाद दिला जाणार नाही.
 
त्यामुळे भक्तांनी उत्सवकाळात गर्दी करू नये. श्रींचे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था ट्रस्टने केली आहे.ट्रस्टच्या वेबसाइट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारेwww.dagdushethganpati. com, http://bit.ly/DagdushethLive, iOS : http://bit.ly/ Dagdushethšiphoneš pp ndroid: http://bit.ly/ Dagdushethš ndroidšppया लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची साेय करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0