या आठवड्यात तुमचा उत्सवाचा काळ अद्याप गेलेला नाही. मागील आठवड्यात तुम्हाल जे काही मिळाले त्यामुळे तुम्ही खूपच खूश आहात. पण तुम्ही यापेक्षाही जास्त मिळवण्याचे अधिकारी आहात. हा आठवडा तुम्हाला भरपूर आनंद देणारा आहे आणि तुम्ही या आनंदात मग्न असणार आहात.
नाेकरी/व्यवसाय : नेहमी जे दिसते ते तसेच असेल असे नाही. तुम्ही तुमच्या कल्पनांमध्ये जगू इच्छित असता आणि परिस्थितीही तुम्हाला वास्तवतेपासून दूर ठेवण्याचे काम करील. तुम्ही खाेलवर विचार करून गाेष्टी समजून घ्यायला हव्यात.अन्यथा येत्या दिवसांत कार्यस्थळावर नव्या समस्या उद्भवू शकतात.
नातीगाेती : या आठवड्यात नात्यांबाबत तुम्ही थाेडे द्विधा मनस्थितीत असणार आहात. मन आणि डाेक्यात द्वंद्व चालू राहील पण शेवटी मनाचा विजय हाेईल.तुम्ही सुंदरतेने नाती जाेपासण्यात यशस्वी व्हाल.
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला ताप आणि गुडघ्याचे दुखणे त्रास देऊ शकते. तसे तुम्ही स्वत:च तुमच्या तब्बेतीबाबत खूप सावध राहात असता. पण या आठवड्यात याबाबत तुम्ही तुमचा ाेकस वाढवायला हवा. जेणेकरून वेळीच त्याचे निदान हाेऊ शकेल..
शुभदिनांक : 12, 15, 16
शुभरंग : गुलाबी, निळा, जांभळा
शुभवार : बुधवार, गुरुवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात अतिउत्साही राहू नये व जाेडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये.
उपाय : साेमवारी सकाळी स्नानानंतर शिवपूजेसाठी पूर्व वा उत्तर दिशेला ताेंड करून बसावे. एखाद्या शिवालयात जाऊन पवित्र पाण्याने अभिषेक करावा.शिवपरिवाराची चंदन, फुल, गूळ, जाणवे, कापूर इ.ने यथाेपचार पूजा व अभिषेक पूजा करावी.