कर्क

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात जगाची चिंता थाेडी कमी करा. कारण तुम्ही विनाकारण चिंता करून स्वत:चेच जास्त नुकसान कराल. स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी तुमच्याकडे खूप सारे पर्याय आहेत. स्वत:ला अशा कामात गुंतवून ठेवा जे भविष्यात तुमच्या उपयाेगी पडेल. या आठवड्यात बेिफकिरी तुमच्या स्वभावात सामील करा.
 
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही कष्ट करता पण नेहमी आपल्याला त्याचे रिझल्ट त्यानुसार मिळत नसतात. याचे कारण हेही आहे की, तुम्ही तुमच्या कामाविषयी सांगता खूपच कमी, पण या आठवड्यात तुम्ही काम करतानाच वरिष्ठांपर्यंत तुम्ही काम करता हे सांगण्याची गरज आहे.
 
नातीगाेती : हा आठवडाही तुमच्यासाठी हेच ध्येयवाक्य घेऊन आला आहे की सावध राहा. सतर्क राहा. या आठवड्यात तुम्ही आश्चर्यचकित हाेऊ शकता कारण तुम्हाला तुमच्याच माणसांचा विराेध सहन करावा लागणार आहे. तेच तुम्ही ज्यांची उपेक्षा करीत आला आहात तेच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील.
 
आराेग्य : या आठवड्यात धावपळ व दगदगीमुळे थकव्याची समस्या असेल. काही दिवसांपर्यंत गुडघे व कंबरदुखी त्रास देऊ शकते. थाेडा वेळ विश्रांतीसाठीही काढा.जेणेकरून स्वत:मध्ये तुम्ही नवी ऊर्जा भरू शकाल आणि दुप्पट जाेमाने कामात तुमचे याेगदान देऊ शकाल.
 
शुभदिनांक : 13, 14, 18
 
शुभरंग : पांढरा, गुलाबी, हिरवा
 
शुभवार : साेमवार, गुरुवार, शनिवार
 
दक्षता : जिथे तुमच्या भावनांना किंमत नसेल त्याबाबत तुम्ही सतर्क राहावे.याबाबत तुम्ही या आठवड्यात निर्णयाच्या स्थितीत असाल.
 
उपाय : या आठवड्यात साेमवारी जवळील शिवालयात जाऊन शिवलिंगावर पाणी अवश्य वाहावे व किमान 101 वेळा ॐ नम: शिवाय चा जप करावा. बुधवारी श्रीगणेशाची आरती करून त्यांना लाडवांचा नैवेद्य दाखवावा.