याेजनांमध्ये व्यावहारिकता विचार अत्यंत गरजेचे आहे. मागील आठवड्यात तुम्ही ज्या याेजना बनवल्या हाेत्या त्या अमलात आणणे कठीण जात असेल कारण त्या लागूकरण्याची क्षमता सध्या तुमच्यामध्ये नाही. या आठवड्यात तुमच्या क्षमतांचे मूल्यांकन करा व कल्पनेच्या जगातून बाहेर या.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात सहकाऱ्यांच्या विराेधामुळे मन अशांत राहील, पण दरवेळेपेक्षा त्यांच्या या वेळच्या बाेलण्यात तथ्य असून तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. कारण यात काेठे ना काेठे आपलेच हित दडले आह.
नातीगाेती : नात्यांमधील चढ-उतारांचा सामना तुम्हाला नेहमी करावा लागताे. आणि हे तुम्हालाही माहीत आहे. यासाठी यामुळे त्रस्त न राहणेच उत्तम ठरेल. कारण शेवटी सारे काही तुमच्या बाजूने हाेताना दिसत आहे. तुमचे काम तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवा.
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे विनाकारण आपण माेसमी आजारांच्या तडाख्यात सापडाल. तसे आठवड्याच्या अखेरीपर्यंत तुमचे आराेग्य उत्तम हाेईल. डाेकेदुखीची समस्या गांभीर्याने घ्या.कारण भविष्यात ती माेठे रूप धारण करू शकते.
शुभदिनांक : 13, 14, 18
शुभरंग : लाल, निळा, जांभळा
शुभवार : रविवार, बुधवार, गुरुवार
दक्षता : या आठवड्यात आपल्यासाठी जेवढे कष्ट कराल त्यापेक्षाही जास्त गरजेचे आहे कष्ट याेग्य दिशेने करणे. ही वेळ आहे आपल्या मार्गांचे पुन्हा एकदा आकलन करण्याची..
उपाय : या आठवड्यात बुधवारी सकाळी लवकर उठून स्नानादि कामांतून निवृत्त हाेऊन एक काशाचा थाळा घ्या. त्यात चंदनाने ॐ गं गणपतये नम: लिहा.त्यानंतर ताटात पाच बुंदीचे लाडू ठेवून जवळ्च्या श्रीगणेश मंदिरात दान करा.