कुंभ

    13-Sep-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही अत्यंत याेग्य दिशेने जात आहात. या आठवड्यात फक्त याचाच विचार करावा की, कसे आपण आपल्या लक्ष्यापर्यंतचा रस्ता पार करू शकताे. तुमच्यासाेबतच्या लाेकांचे सहकार्यही तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यांचे सहकार्य कसे मिळवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही सध्या दाेन नावांवर स्वार आहात तुम्हाला दाेन्ही नावांचा प्रवास याेग्य वाटत आहे आणि तसे आहे ही. पण यशासाठी तुम्हाला एकाची निवड करावी लागणार आहे. निवड करताना स्वत:ची क्षमता व आवड विचारात घ्यावी. जेणेकरून ते भविष्यात ओझे ठरणार नाही.
 
नातीगाेती : आंबटगाेड क्षण, थाेडी कुरबूर व थाेडे प्रेमही असेल. तुम्ही थाेडे गाेंधळलेल्या स्थितीत असणार आहात. पण आठवड्याच्या शेवटी तुम्ही याेग्य अयाेग्यचा निर्णय सहजतेने करू शकाल व एका निष्कर्षावर पाेहाेचाल. तुमचा हा प्रयत्न भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
 
आराेग्य : हृदयासंबंधित आजार या आठवड्यात तुम्हाला त्रास देऊ शकताे.नियमित हेल्थ चेकअप करवून घेण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून काेणताही आजार तुम्हाला अचानकपणे त्रास देऊ शकणार नाही. या आठवड्यात पायांनाही त्रास हाेऊ शकताे व कंबरदुखीही सतावू शकते.
 
शुभदिनांक : 12, 15, 16
 
शुभरंग : जांभळा, हिरवा, गुलाबी
 
शुभवार : बुधवार, गुरुवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नेहमीपेक्षा जास्त सावध राहावे. गाेष्टी तुमच्या बाजूने हाेत आहेत पण दक्षतेअभावी त्या बदलू शकतात.
 
उपाय : शनिवारी वडाची आठ पाने घेऊन काळ्या धाग्यात ओवून मारूतीला अर्पण करावीत. तसेच कागदी बदाम अर्पण करावेत. तंनतर निम्मे बदाम काळ्या कापडात बांधून घराच्या दक्षिण दिशेला लपवून ठेवावेत.