एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डाॅ. उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 

SNDT_1  H x W:  
 
 
नागपूरच्या मनाेरमाबाई मुंडले काॅलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डाॅ. उज्ज्वला शिरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामाेदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह काेश्यारी यांनी डाॅ. चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डाॅ. उज्ज्वला चक्रदेव यांनी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीईतून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर शहर नियाेजन या विषयात एम. टेक., तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. डाॅ. चक्रदेव यांनी मनाेरमाबाई मुंडले काॅलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी.पर्यवेक्षक म्हणून काम केले असून, त्यांना अध्यापन, संशाेधन व प्रशासन क्षेत्रात 36 वर्षांचा अनुभव आहे.