पृथ्वीजवळ एक लघुग्रह येत असल्याचा इशारा ‘नॅशनल एराेनाॅट्निस अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’ या संस्थेने (नासा) दिला आहे. मात्र, त्यापसून काेणताही धाेका नसल्याचा दिलासाही देण्यात आला आहे.‘नासा’च्या लघुग्रहविषयक डेटा लॅबाॅरेटरीने हा इशारा दिला असून, या लघुग्रहाचा आकार प्रख्यात ‘एम्पायर स्टेट’ या इमारतीपेक्षा दुप्पट आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या काेणत्याही भागावर धडकणार नसला, तरी ताे पृथ्वीच्या वरून जाणार आहे. मात्र, पृथ्वीवरून जाताना ताे चंद्रापेक्षा कमी अंतरावर असेल. ‘2010 आरजे 53’ असे नामकरण करण्यात आलेल्या या लघुग्रहाचा व्यास सुमारे 774 मीटर (2,539.37 फूट) असून, ताे पृथ्वीपासून अंदाजे तीन लाख 66 हजार किलाेमीटर अंतरावरून जाईल. म्हणजेच पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचे अंतर खूपच कमी असेल, असे ‘नासा’ने नमूद केले आहे.पुढील शतकापर्यंत पृथ्वीला काेणत्याही लघुग्रहांपासून धाेका नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले असले, तरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा धाेका गृहीत धरण्यात आला आहे. या बलामुळे अंतराळातून जाणाऱ्या एखाद्या वस्तूचा मार्ग बदलण्याची श्नयता असते. मात्र हा लघुग्रह कधी पृथ्वीजवळून जाणार याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.