पंजाबचे औद्योगिक शहर लुधियाना शहरातील सराभाननगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘बेल्जियम चॉकलेट’ ची २०० किलो वजनाची व साडेचार उंचीची ‘चॉकलेट गणेश’ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
गेल्या ८ वर्षांपासून लुधियाना येथील बेलफ्रान्स बेफर्स बेल्जियम चॉकलेट पासून गणेशमूर्ती बनविते. यावेळी ही गणेशमूर्ती तयार करण्यासाठी बहुतेक वस्तू इटलीमधून मागविण्यात आल्या होत्या.