असे म्हणतात की, ‘भगवान जब देता है, ताे छप्पर फाडकर देता है’.अशीच काहीशी स्थिती अमेरिकेतील मॅसेच्युएटस येथे एका इसमाची झाली.त्याला सन 2006 मध्ये 7 काेटी 45 लाख रु.ची लाॅटरी लागली हाेती आणि आता पुन्हा याच इसमाला च्नक 112 काेटींचा जॅकपाॅट लागला आहे.मॅसेच्युएटस राज्य लाॅटरीच्या प्रव्नत्याने सांगितले की, हा इसम ब्रेनट्री येथील जाॅन हॅमिल आहे. त्याने मॅसेच्युएट्स मिलेयनेअर्स क्लब इन्स्टंट तिकीट गेमद्वारे हा जॅकपाॅट जिंकला आहे.