अमेरिकेत नव्याप्रकारे बांधलेल्या घरांची जाेरात विक्री सुरू आहे.गेल्या दाेन महिन्यात थ्रीडी प्रिंटिंगटेक्नोलोजीवापरून बांधलेल्या 82 घरांची विक्री झाली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये 1000 लाेक आहेत.अगाेदरच घराचे स्पेअर पार्टस् तयार करून नंतर हेपार्टस जाेडून 24 तासांत घर तयार करता येते. यासाठी थ्रीडी प्रिंटिंग टेक्नोलोजीचा वापर करण्यात येताे. हीटेक्नोलोजी1980 पासून प्रचलित झाली आहे.आता या टेक्नोलोजीचा वापर खूपच वाढला आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, मे्निसकाेसहित आशिया, मध्यपूर्व देशात थ्रीडी प्रिंटिंगद्वारे इमारत, फ्लॅट बांधण्यात येत आहेत. जगातील सर्वांत माेठी सिमेंट उत्पादक कंपनी हाेलसीम आणि ब्रिटिश कंपनी सीडीसी ग्रुप मलावीमध्ये फ्नत 12 तासांत घरे बांधत आहे.मे्निसकाेमध्ये आयकाॅन कंपनीने या टे्ननाॅलाॅजीद्वारे नुकतीच 10 घरे बांधली आहेत. यूराेपमध्ये पहिल्या थ्रीडी प्रिंटेड घरांच्या चाव्या (किल्ल्या) आईंडहाेवन मध्ये (नेदरलॅड) गेल्या महिन्यात 30 जुलैला सुपूर्द करण्यात आल्या.