मनगट सतत दुखत असेल, तर...
29-Aug-2021
Total Views |
मनगटात दीर्घकाळ दुखत राहण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. जुना मार, कॉम्प्युटर व ङ्गोनचा जादा वापर, अंगठ्याचा टेंडन बिघडणे वा संधिवातासारखा आजार होणे. पोषणाचा अभाव वा शरीरात कॅल्शियमची पातळी घसरल्यामुळेही दुखण्यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
उपचारासाठी सल्ला
- शारीरिक रूपात सक्रिय राहावे. वेळेवर जेवावे. जेवणात दूध, अंडी, तसेच मासे खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतील. जास्तीत जास्त पाणी प्यावे. कारण ते शरीरातून यूरिक ऍसिड बाहेर काढते. योग व व्यायाम करावा. स्थूलतेवर नियंत्रणासोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
- पुरुषांपेक्षा स्त्रिया हाडांच्या रोगाने जास्त त्रस्त असतात. संधिवातासारख्या रोगांनी ग्रस्त महिलांच्या हातात वेदना होणे व्यापक समस्या आहे. तणाव व झोपेच्या अभावामुळेही वेदनेची समस्या वाढते.
- अवजड कामे करताना मनगटावर रिस्टगार्डचा वापर करू शकता. आपण की-बोेर्डवर खूप जास्त काम करीत असाल, तर मधूनमधून हातांना आराम द्या. हातांची थोडी मूव्हमेंट करा. काम करण्याची पद्धत योग्य ठेवा, तसेच शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य असल्याची खात्री करून घ्या.