मनगट सतत दुखत असेल, तर...

29 Aug 2021 10:52:14
 

hand_1  H x W:  
 
मनगटात दीर्घकाळ दुखत राहण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. जुना मार, कॉम्प्युटर व ङ्गोनचा जादा वापर, अंगठ्याचा टेंडन बिघडणे वा संधिवातासारखा आजार होणे. पोषणाचा अभाव वा शरीरात कॅल्शियमची पातळी घसरल्यामुळेही दुखण्यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
 
उपचारासाठी सल्ला
  • शारीरिक रूपात सक्रिय राहावे. वेळेवर जेवावे. जेवणात दूध, अंडी, तसेच मासे खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतील. जास्तीत जास्त पाणी प्यावे. कारण ते शरीरातून यूरिक ऍसिड बाहेर काढते. योग व व्यायाम करावा. स्थूलतेवर नियंत्रणासोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
  • पुरुषांपेक्षा स्त्रिया हाडांच्या रोगाने जास्त त्रस्त असतात. संधिवातासारख्या रोगांनी ग्रस्त महिलांच्या हातात वेदना होणे व्यापक समस्या आहे. तणाव व झोपेच्या अभावामुळेही वेदनेची समस्या वाढते.
  • अवजड कामे करताना मनगटावर रिस्टगार्डचा वापर करू शकता. आपण की-बोेर्डवर खूप जास्त काम करीत असाल, तर मधूनमधून हातांना आराम द्या. हातांची थोडी मूव्हमेंट करा. काम करण्याची पद्धत योग्य ठेवा, तसेच शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य असल्याची खात्री करून घ्या.
Powered By Sangraha 9.0