कन्या

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
तुम्ही तुमच्या कामात खूप परिश्रम घ्याल व आपल्या आनंदाची व यशाची खूप स्वप्ने पाहाल. पण जाेमाच्या भरात घाईगडबड करू नये अन्यथा फक्त कामातच नुकसान हाेणार नाही तर कार्यक्षेत्रात गुप्तशत्रूही सावध हाेतील. जमीनजायदादीसंबंधित काही समस्या उद्भवू शकतात पण वरिष्ठ व्यक्तीच्या मध्यस्थीने त्या सुटू शकतात.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा व्यावसायिक माेर्चावर हुशारीने पुढे जाण्याचा आहे व यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्यही लाभणार आहे. बँकिंग, प्रिंटिंग, औषधे, केमिकल, शासकीय कामे, वकिली, शिक्षण संस्थांची कामे इ.त काम करणारे उत्तम पराॅर्मन्स देतील. ट्रेनिंग, कंसल्टन्सी, सेल्स व मार्केटिंग, स्टेज पराॅर्मन्स इ.त लक्ष द्यावे लागेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या प्रेमसंबंधाकडे जास्त राहणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियपात्राला खूश ठेवण्यासाठी डेटिंगवर जाण्याची किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी फिरायला जाण्याची याेजना आखू शकता. त्याचप्रमाणे जे नवे संबंध जाेडू इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीबाबत विशेष चिंताजनक स्थिती नाही पण आपल्यामध्ये थाेडीशी व्याकुळता राहणार आहे वा जागरण वा अस्वस्थता हाेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ज्यांना खांद्याचे स्नायू, डाेळ्यांच्या समस्या, दात व हिरड्यांचा त्रास, मानदुखी असेल त्यांचा त्रास वाढू शकताे.
 
शुभदिनांक : 02, 03, 07
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमच्या बेपर्वाईमुळे अनेक अडचणी येऊ शकतात. लव्ह पार्टनर असाे वा जाेडीदार त्यांच्या भावना दुर्लक्षू नका.
 
उपाय : शिवपूजनाच्या वेळी दही, तांदूळ, साखर, शुभ्र चंदन इ. वाहावे. शिवपूजेत पांढरी फुले वापरावीत