वृश्चिक

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही जे काही करू इच्छिता त्यासाठी तुम्हाला सहजगत्या संधी मिळू शकेल. वेळेचा सदुपयाेग करा आणि आजचे काम उद्यावर ढकलणे टाळा अन्यथा हाती आलेली संधी निघून जाईल. कार्यक्षेत्रात काेणत्याही प्रकारची बेपर्वाई करणे टाळा. वैयक्तिक नात्यांबाबत दक्षता बाळगा. काेणत्याही प्रकारचा उतावीळपणा तुमच्या संबंधालाच नव्हे तर प्रतिष्ठेलाही घातक ठरू शकताे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला स्पर्धकांमध्ये काम करण्याची तयाी ठेवायला हवी. जर स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर तुम्ही तुमच्या गुणवत्तेशी छेडछाड केली नाही तर शत्रू व प्रतिस्पर्धकांवर मात करू शकाल. काेर्टकचेरी व सरकारी कामांत खर्च वाढू शकताे. प्रतिष्ठा जाणार नाही असे काहीही करू नये.
 
नातीगाेती : कुटुंबीयांसाेबत आनंदात वेळ घालवाल. एखाद्या सहलीलाही जाऊ शकता. यश-कीर्ती आणि आनंद मिळेल. प्रेमसंबंधासाठीही हा उत्तम काळ आहे.या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे.
 
आराेग्य : या आठवड्यात ब्लडप्रेशर, मायग्रेन व डाेळ्यांची जळजळ अशा समस्या राहू शकतात. विशेषकरून आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंबरदुखी वा पित्ताचा त्रास हाेऊ शकताे. शक्यताे विपरित जेवण घेणे टाळावे. सध्या प्रवासादरम्यान तुम्ही अस्वस्थ राहू शकता त्यामुळे दूरचा प्रवास टाळावा.
 
शुभदिनांक : 01, 04, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही प्रकारे चिंतेला कुरघाेडी करू देऊ नका.कारण हे प्रेशर तुम्हाला सतावू शकते.
 
उपाय : या आठवड्यात शंकराची पूजा करताना तूपवाहावे. हा उपाय श्रद्धापूर्वक करावा.