स्वच्छतागृहातील साेन्यामुळे तपास अधिकारीही अचंबित

    02-Aug-2021
Total Views |
 
रशियातील मुख्य वाहतूक पाेलिस अधिकाऱ्याने चैनीसाठी घेतली लाच
 

russia_1  H x W 
 
रशियातील निलंबित वाहतूक पाेलिस अधिकाऱ्याच्या घरातील साेन्यामुळे तपास अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. या घराच्या अंतर्भागाची सजावट साेन्याने करण्यात आली असून, स्वच्छतागृहातसुद्धा साेन्याचा वापर केला असल्याचे दिसून आले.भ्रष्टाचाराच्या आराेपावरून दक्षिण स्तावरपाेल विभागाचा मुख्य वाहतूक पाेलिस अधिकारी कर्नल अले्नसी साफाेनाेव्ह (वय 45 वर्षे) याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या हाताखाली असलेल्या 35 अधिकाऱ्यांसाेबत त्याने भ्रष्टाचार केल्याचा आराेप त्याच्यावर असून, चैनीत जगण्यासाठी ताे लाच घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांची एक टाेळीच हाेती.(क्रिमिनल रिंग). या टाेळीतील साफाेनाेव्हसह विद्यमान आणि माजी वाहतूक पाेलिस निरीक्षकांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आराेप सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
 
आराेप सद्ध झाल्यास, या सर्वांना 15 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा हाेऊ शकते.साफाेनाेव्ह किती चैनीत जगत हाेता हे दाखविणारा एक व्हिडिओ तपास पथकाने प्रसिद्ध केला आहे. त्याच्या घरातील बहुतेक अंतर्गत सजावटीत साेन्याचा वापर केलेला दिसताे. विशेष म्हणजे, घरातील स्वच्छतागृहाच्या सजावटीतही मुबलक साेने वापरले गेले आहे. स्वच्छतागृहातील फरशा आणि भिंती संगमरवरी असून, एक महाग आरसाही तेथे आहे. या आरशासह बाथरूम बिनेटची फ्रेम साेन्याची आहे. शयनकक्षातील भिंतींना साेन्याचामुलामा असलेले वाॅलपेपर आहेत आणि जिन्याचे कठडे तसेच घराच्या छतासाठीसुद्धा साेन्याचा वापर केलेला दिसताे.स्थानिक माेटारचालकांकडून लाच घेणे तसेच सुरक्षा चाै्नयांच्या जाळ्यातून निसटण्यासाठी ट्रकचालकांना पास देऊन साफानाेव्हने पैसा कमाविल्याची माहिती तपास पथकाकडून देण्यात आली. साफानाेव्हने आतापर्यंत सुमारे दाेन लाख पाैंड (सुमारे 2,06,84,868 रुपये) मिळविल्याचा अंदाज आह