मिरा-भाईंदरमध्ये प्लॅस्टिकविराेधात कारवाई

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 
plastic_1  H x
 
मिरा-भाईंदर महापालिकेने कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकविराेधात कारवाई सुरू केली असून, मंगलनगर, हटकेश या परिसरात प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुचाकीवरून प्लॅस्टिकची वाहतूक करणाऱ्या एका महिलेवरही पालिकेने गुन्हा दाखल केला आहे.महापालिका आयुक्त दिलीप ढाेले यांच्या आदेशानुसार सार्वजनिक आराेग्य विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे सहायक आयुक्त सचिन बच्छाव, स्वच्छता निरीक्षक अनिल राठाेड, प्रभाग 4 चे फेरीवाला पथक प्रमुख रणजित भामरे यांनी कारवाई करुन 180 किलाे प्लॅस्टिक जप्त केले आहे.
 
हटकेश परिसरात नियमित साफसफाईचे काम सुरू असताना दुचाकीवरून प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन जाणारी एक महिला आढळली. त्याबाबत विचारणा केली असता, या प्लॅस्टिकच्या पिशव्या विविध फेरीवाले, भाजी विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याचे सांगितले. या महिलेच्या वाहनावर प्रेस असे स्टिकर आढळले असून, ही महिला पेणकर पाडा येथील रहिवासी आहे. या महिलेला दंड भरावयास सांगितले असता तिने दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे तिचे वाहन महापालिकेने जप्त केले. मिरा राेड पाेलिस ठाण्यात या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.