मीन

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 
horoscope_1  H
 
 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रज्ञत विस्तार करण्यासाठी याेग्य दिशेने पावले उचलाल. धनप्राप्तीचा मार्ग सुगम हाेईल. उत्पन्नाचे विविध स्राेत तयार हाेतील, पण उत्पन्नाच्या मानाने खर्चाचे प्रमाण जास्त राहील. आठवड्याच्या मध्यात एखाद्या खास व्यक्तीबाबत लळा वाढेल. कार्यक्षेत्रात कामाचे ओझे जास्त राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात सहकाऱ्यांच्या विराेधामुळे मन अशांत राहील.
पण दर वेळेपेक्षा यावेळी त्यांच्या बाेलण्यात तथ्य असेल. तुम्हाला तुमचा अहंकार बाजुला ठेवून त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. कारण त्यामध्येही कुठे ना कुठे तुमचेच हित दडलेले आहे. गाेष्टी दुर्लक्षिण्याऐवजी त्या तर्काच्या कसाेटीवर एकदा अवश्य पारखून घ्या.
 
नातीगाेती : नात्यांमध्ये चढ-उताराचा सामना तुम्हाला वरचेवर करावा लागताे आणि हे तुम्हीही बारकाईने समजता. यासाठी यामुळे त्रस्त राहू नका. कारण अखेरीस सारे काळी तुमच्या मनासारखे हाेताना दिसत आहे. मात्र तुमचे काम तुमच्या कुटुंबीयांपासून अजिबात वेगळे ठेवा.
 
आराेग्य : आराेग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या तुमच्या सवयीमुळेच तुम्ही विनाकारणच माेसमी आजारांच्या तावडीत सापडत आहात. तसे आठवड्याच्या अखेरीपर्यंत तुमची तब्बेत बरी हाेईल. डाेकेदुखीची समस्या गांर्भीयाने घ्या. कारण भविष्यात ही माेठे रूप घेऊ शकते. सावध राहावे.
 
शुभदिनांक : 01 04, 05
 
शुभरंग : पांढरा, लाल, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : अतिउत्साह व जादा आत्मविश्वास यामुळे तुम्ही विराेधकांना कमकुवत समजू लागता. नेहमी सावध राहावे अन्यथा तुम्हाला त्रास हाेऊ शकताे.
 
उपाय : या आठवड्यात शंकराला हळदयुक्त दुधाचा अभिषेक करावा. हा उपाय खूप लाभदायक आहे.