सिंह

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 
horoscope_1  H
 
या आठवड्यात जर चांगल्या व्यक्ती तुमच्यासाेबत संबंध जाेडू इच्छित असतील तर त्यांना जवळ येण्याची संधी द्या. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाद्वारे लाेकांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घ्याल. ज्यामुळे ते तुमच्यासाेबत दीर्घकाळासाठी व्यवहार करू इच्छितील व ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा डिझायनिंग, प्राॅडक्ट, कन्सल्टंसी, रियल इस्टेट, लाल रंगाच्या वस्तू, इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या कामांमघ्ये असणाऱ्यांसाठी उत्तम असणार आहे. भागिदारीच्या कामात सावध राहावे. शिक्षण, मीडिया, बॅंकिंग इ.तील समस्या दुसऱ्या दिवसापासून कमी हाेतील. कामकाजासंबंधित प्रवासाला थाेडा उशीर लागू शकताे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या मित्रांसाेबत जास्त वेळ घालवाल.तसेच मधल्या काळात प्रियपात्रासाेबत जवळीक वाढवण्याचे चान्स आहेत. काेणत्याही प्रकारे तुमच्या कम्युनिकेशनची शैली वा नकळत बाेललेल्या गाेष्टी जाेडीदार वा प्रियपात्राला खटकणार नाही याची काळजी घ्यावी.
 
आराेग्य : या आठवड्यात विशेष करून ज्यांच्या कंबरेखालील भागात एखादा त्रास असेल त्यांनी उपचाराकडे लक्ष द्यायला हवे. इतर काेणत्याही खास समस्या दिसून येत नाहीत. दातदुखी, नाक, कान, घशाच्या समस्या सध्या कमी हाेतील. अखेरच्या दाेन दिवसांत जडान्न व तेलकटतिखट पदार्थांऐवजी द्रवपदार्थ जास्त घ्यावेत.
 
शुभदिनांक : 01, 05, 06
 
शुभरंग : लाल, पांढरा, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात प्रेम व्यक्त करताना व प्रपाेज करताना जास्त पारदर्शकता व स्पष्टपणा ठेवा.
 
उपाय : या आठवड्यात शिवकृपा मिळवण्यासाठी रुद्राष्टक व शिवगायत्रीचे नित्य पठण करा.