लाेकन्यायालयाच्या न्यायाधीशपदी तृतीयपंथी ज्याेईता माेंडल

    02-Aug-2021
Total Views |
 

jyoita mandal_1 &nbs 
 
 
आपल्या देशात प्राचीन काळापासून तृतीयपंथीयांना वाईट वागणूक मिळत आहे.महाभारत काळात तृतीयपंथींना शिखंडी म्हणत असत. पण आता काळ बदलत आहे. नगरसेवक पदापासून ते महापाैर, मंत्रीच नव्हे तर आता तृतीयपंथी चक्क न्यायाधीश पद भूषवित आहेत.न्या. ज्याेईता माेंडल सध्या लाेकन्यायालयाच्या न्यायाधीश आहेत.देशात तृतीयपंथी एकटे पडतात. त्यांना त्यांच्या घरात आणि समाजातही वाईट वागणूक मिळते. पूर्वी तृतीयपंथीयांना शिखंडी म्हणून हिणवीत असत तर आता हिजडा म्हणून हिणवितात. पण आता काळ बदलत आहे व तृतीयपंथीयांचा भविष्यकाळ उज्वल दिसू लागला आहे. कारण सुप्रीम काेर्टाने तृतीयपंथीयांना स्वतंत्र दर्जा दिला आहे. यानंतर या समाजाची स्थिती हळूहळू बदलत आहे.
 
आता तृतीयपंथीयांना विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. ज्याेईता माेंडलचा जन्म एका हिंदु कुटुंबात झाला. पण ज्याेईता हिंमत हरली नाही. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जाऊन तृतीयपंथीयांच्या उद्धारासाठी निरनिराळी कामे सुरू केली.यासाेबतच काॅरसपाॅन्डन्स (पत्राचार) काेर्सच्या माध्यमातून कायद्याची पदवी मिळविली. शेवटी जुलै 2017 मध्ये ज्याेईता माेंडल (मंडल)ची लाेकन्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.पण बालपणापासूनच ज्याेईताच्या नशिबी तिरस्कार आला. अनेक प्रकारचा अपमान, विटंबना आणि तिरस्कार सहन करावा लागला.ज्याेईता 10वीत शिकत असताना तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर ज्याेईताने भीक मागून भूक भागविली. रात्री बसस्थानक, रेल्वेस्टेशन किंवा रस्त्याच्या कडेला झाेपून रात्र काढावी लागत असे.