ताणाच्या पिंजऱ्यातून सुटण्यासाठी...

    02-Aug-2021
Total Views |
 

happiness_1  H  
 
दरराेजचा दिवस उत्तम आणि सकारात्मक रितेने जावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागतेच. खूप छाेट्या छाेट्या गाेष्टींनी खरेतर हे साध्य हाेण्यासारखे आहे. त्यासाठी काही चांगल्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, दिवसाची सुरुवात चांगली झाली, तर पूर्ण दिवस चांगला जाताे. दिवसाची सुरुवात कशी हाेते, याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडताे.काही अभ्यासांनुसार, आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करून आपला दिवस चांगला घालवू शकताे. तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने, हसत आणि सकारात्मकपणे करायची असेल, तर सकाळी उठल्यावर सर्वांत आधी स्वत:ला स्ट्रेस फ्री करा. जास्त स्ट्रेस घेतल्याने शारीरिक आणि मानसिक राेग हाेण्याची शक्यता असते. सकाळी आनंदी राहाल तर दिवसही चांगला जाईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी राेज 5 मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज करा.
 
आपल्याला मिळालेले निराेगी शरीर, घर, मित्र-मैत्रिणी, आपल्या ऑफिसमधील लाेक, आपल्याला घरात मदत करणारे सर्व प्रकारचे लाेक यांच्याविषयी कृतज्ञ राहा. यामुळे आपला त्रासदायक अहंकार कमी हाेऊन आपण अधिक नम्र आणि शांत हाेऊ लागताे. असे केल्याने तुमच्या डाेक्यात केवळ सकारात्मक गाेष्टींचाच विचार येईल. याने तुम्हाला दिवसभर आनंदी राहण्यास मदत मिळेल. अभ्यासकांनुसार, सकारात्मक असल्याने आपला मेंदू आणखी चांगलं काम करताे.याने आपली काम करण्याची क्षमताही वाढते. तुमच्या नेहमीच्या कामासाेबतच काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही कुणाचीही मदत घेऊ शकता.आजकाल आपण सर्वच हिशेबी वृतीने काम करत असताे. विचार करत असताे हे केलं तर काय मिळेल, हे शिकलं तर काय फायदा हाेईल, यामुळे आपण काेणाला मदत करायला, विश्वास ठेवायला कचरताे.त्यामुळे काहीतरी असे काम केले पाहिजे ज्यातून कुठलाही माेबदला मिळण्याची गरज नाही.