नवी मुंबई पालिकेची 22 लाखांची दंडवसुली

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 
fine_1  H x W:
 
काेराेना राेखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधस्तरांत नवी मुंबई तिसऱ्या गटात आहे. त्यानुसार दुकाने व आस्थापना सायंकाळी 4 पर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. या निर्धारित कालावधीनंतरही व्यापारी दुकाने सुरू ठेवतात. असे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविराेधात महापालिकेच्या दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथके व आठ विभाग कार्यालय स्तरावरील पथकांनी 2442 जणांवर कारवाई करत 22 लाख 88 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. वाशी सेक्टर 30 ए येथील हाऊस ऑफ लाॅर्ड्स पबवर बडगा उगारण्यात आला. पबच्या मालकाकडून 50 हजारांची दंडवसुली करण्यात आली. नवी मुंबई महापलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून काेराेना नियमांचे उल्लंघन करणारे 70583 नागरिक, आस्थापनांकडून 3 काेटी 56 लाख 59 हजार 150 इतक्या रकमेचा दंड वसूल केला आहे.नागरिकांनी काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी नियमांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.