डाॅक्टरांकडे पूर्ण तयारीनिशी जा

    02-Aug-2021
Total Views |
 
सर्व लक्षणे सांगा व जुने मेडिकल रेकाॅर्ड साेबत न्या
 

doctor_1  H x W 
 
 
जेव्हा पेशंट डाॅक्टरांकडे जाताे तेव्हा ताे 5 ते 15 मिनिटांचा वेळ घेत असताे. याला अ‍ॅव्हरेज टाइम म्हणतात. अनेकदा पेशंट आजार डाॅक्टरांना व्यवस्थित सांगू शकत नाही.यासाठी डाॅक्टरांकडे जाताना पूर्ण तयारीनिशी जावे.जुने सारे डाॅक्यूमेंट्स वा मेडिकल रेकाॅर्ड घेऊन जावेत.जेवढे प्रश्न मनात असतल ते डाॅक्टरांकडे जाण्यापूर्वी कागदावर लिहून घ्या.काेणतेही लक्षण वा माहिती दडवू नका.
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी व एखादे व्यसन असेल तर तेही डाॅक्टरांना सांगावे.जर एखाद्या डाॅक्टरकडून सेकंड ओपिनियन घेत असाल तर त्याविषयीही आपल्या डाॅक्टरांना विचारू शकता.उपचाराच्या जेवढ्या पद्धती उपलब्ध असतील त्यांच्याविषयी डाॅक्टरांशी चर्चा करू शकता.जर पूर्वी एखादा उपचार दिला गेला असेल आणि ते औषध आपण घेतले नसेल तर त्याविषयीही डाॅक्टरांना माेकळेपणाने सांगावे.
 
जर एखाद्या औषधाचा त्रास असेल तर तेही न संकाेचता सांगावे.सल्ला घेण्यासाठी नातेवाईक वा मित्राला साेबत अवश्य घेऊन जावे. जेणेकरून डाॅक्टरांचा सल्ला व्यवस्थित समजू शकेल.काेणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असेल तर ते डाॅक्टरांना अवश्य सांगावे.जीवनशैलीत आलेल्या बदलाविषयी चर्चा करावी.आजारामुळै आपल्या जीवनात जाे बदल झाला आहे त्याबाबत बाेलावे.एक्सरसाइजविषरूी आपल्या डाॅक्टरांना विचारू शकता.भविष्यात काेणत्या लक्षणांवर लक्ष ठेवावे याविषयी डाॅक्टरांशी बाेलावे.आजाराबाबत जर एखादे साहित्य उपलब्ध असेल तर त्याविषयीही विचारू शकता.