भेटीगाठी कमी झाल्यामुळे वृद्धांमध्ये डिप्रेशन येण्याचा धाेका वाढला

    02-Aug-2021
Total Views |
 
 

corona_1  H x W 
 
काेराेना महामारी दरम्यान कामकाजाच्या दृष्टीने व्हर्च्युअल माध्यम उपयुक्त ठरले. परंतु वृद्धांचे एकटेपण दूर करण्यात ते प्रभावी दिसले नाही. नव्या अध्ययनानुसार भेटीगाठी कमी झाल्यामुळे वृद्धांमध्ये डिप्रेशनचा धाेका वाढला आहे व त्यांच्यातील एकटेपणा कमी हाेण्याऐवजी जास्तच वाढला आहे.अध्ययन करताना असे आढळून आले की, हाऊस पार्टी आणि झूम यासारखे अ‍ॅप वृद्धांसाठी त्यांची एकटेपणाची भावना वाढविणारे ठरले. लँकेस्टर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, काेराेना महामारी दरम्यान आभासी संपर्क असणारे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाेकांनी व्हिडिओ चॅट पासून दूर राहणाऱ्या वृद्धांच्या तुलनेत जास्त एकटेपणाचा अनुभव घेतला.या अध्ययनाचे प्रणेते डाॅ. यांग हू म्हणाले की, या निष्कर्षावरून असे स्पष्ट हाेते की, संपर्काचे आभासी साधन वृद्धांचे वैयक्तिक भेटीगाठी आणि संभाषणाची जागा घेऊ शकले नाही. या शास्त्रज्ञांनी इंग्लंडचे 5,148 आणि अमेरिकेच्या 1,391 वृद्धांचा सर्व्हे करून डाटाचे विश्लेषण केले. या दाेन्ही देशात काेराेना दरम्यान ज्या वृद्धांना मित्र, नातेवाइकांशी वैयक्तिक संपर्क करता आला, त्यांचे मानसिक आराेग्य उत्तम हाेते.