कर्क

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम प्रतीचे फळ देणारा असणार आहे. तुमच्याकडून अनेक चुका हाेऊ शकतात व त्याचा ायदा काहीजण घेऊ शकतात. तुम्हाला तुमच्या व्यवसायाला नवी गती देण्यासाठी एखादा नवा यनान्सर शाेधावा लागू शकताे. प्रवासासाठी आठवडयातील मधला काळ उत्तम राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : वाहन वा स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री इ.त दूरच्या ठिकाणाहून एखादी नवी संधी मिळू शकते. तुम्ही त्यातून कमाई करण्याची स्वत:ची याेजना बनवू शकता पण याला थाेडा उशीर लागू शकताे. नाेकरदारांना वरिष्ठांकडून कमी सहकार्य लाभेल. कायदेशीर व सरकारी केसेसमुळे धंद्यात थाेडे अडकून राहाल.
 
नातीगाेती : तुमचे प्रेमसंबंध वेगाने पुढे जात राहतील. जे पूर्वीपासून संबंधांत आहेतत्यांच्या भेटीच्या याेजना तयार हाेतील वा कम्युनिकेशनद्वारे ते सतत परस्परांशी जाेडलेले राहतील. एखादी प्रवासाला जाण्याची याेजना बनवून प्रियकरासाेबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. नवे संबंधही सुरू हाेऊ शकतात.
 
आराेग्य : तुमच्या आराेग्याच्या काही तक्रारी असणार आहेत. विशेषकरून अनपेक्षित दुखापत वा हृदयाच्या धडधडीत अनियमितपणा, डाेळ्यांची जळजळ व रक्ताभिसरणाची समस्या असण्याची जास्त शक्यता आहे. काेणतीही समस्या असली तरी घरगुती उपचाराऐवजी डाॅक्टरांच्या सल्ल्याने याेग्य उपचार घ्यावेत.
 
शुभदिनांक : 01, 04, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात जास्त तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकताे. प्रवासात खूप सावध राहावे.
 
उपाय : गायत्री मंत्राचा पाचवेळा जप करावा. शंकरासाेबत पार्वतीचेही स्तवन करावे. यामुळे वैवाहिक समस्या दूर हाेतील.