विराट ब्लॅक हाेलमधून प्रथमच रंगीत प्रकाश दिसला

    02-Aug-2021
Total Views |
 
हे ब्लॅकहाेल पृथ्वीपासून 80 काेटी प्रकाशवर्ष दूर आहे
 
 

blackhole_1  H  
 
 
खगाेल शास्त्रज्ञांनी प्रथमच ब्रम्हांडातील विराट ब्लॅक हाेलच्या मागच्या भागातून रंगीत प्रकाश पाहिले आहे. अमेरिकेच्या स्टॅनफाेर्ड विद्यापीठाचे खगाेलशास्त्रज्ञ डेन विल्किन्स आणि राॅजर ब्लॅक फाेर्ड यांनी हे प्रतिपादन केले आहे.या नव्या संशाेधनामुळे अल्बर्ट आईन्स्टाईन य शास्त्रज्ञाची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी खरी ठरली आहे.अमेरिकन खगाेल शास्त्रज्ञ म्हणाले की, आम्ही झाविकी-1 नावाच्या स्पायरल गॅल्नसीमध्ये आलेल्या विराट ब्लॅकहाेलचे बारकाईने अध्ययन केले. या गॅल्नसी पृथ्वीपासून 80 काेटी प्रकाशवर्ष दूर आहे. संशाेधन सुरू असताना ब्लॅकहाेलच्या मागच्या भागातून ए्नसरेज निघत असल्याचे दिसून आले. हा रंगीत प्रकाश ब्लॅकहाेलच्या बाऊंड्रीजवळ तिरप्या बाजूने वळला. आतापर्यंत काेणत्याही ब्लॅकहाेलमधून प्रकाश दिसलेला नाही, असे खगाेल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.कारण ब्लॅकहाेलजवळ उल्का पिंड आल्यास ते ब्लॅकहाेलमध्येच सामावून जाते. या ब्लॅकहाेलमध्ये अति प्रचंड गुरुत्वाकर्षण असते. रंगीत प्रकाश ब्लॅकहाेलच्या मागच्या बाजूला फिरत असलेल्या मटेरियल्समधून येत हाेता, असे खगाेलशास्त्रज्ञांनी सांगितले.
 
ब्लॅकहाेलचे अति प्रचंड गुरुत्वाकर्षण बळामुळे प्रकाश तिरप्या बाजूला वळला. अशा प्रकारचा हा प्रकाश प्रथमच दिसला. अल्बट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने 1916 मध्ये थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी ही थिअरी खरी ठरल्याचे सांगितले.या थिअरीनुसार गॅल्नसीचा प्रकाश इतर काेणत्याही तारा किंवा गॅल्नसी (मंदाकिनी) जवळून गेल्यास पहिला तारा अतिप्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे हा गॅल्नसी तारा गिळंकृत करते. भारताच्या मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे सेवानिवृत्त वरिष्ठ खगाेलशास्त्रज्ञ डाॅ. मयंक बाहिया यांनी स्पष्ट केले की, काेणत्याही ब्लॅक हाेलच्या आजूबाजूला एक माेठी डिस्क (तबकडी). गाेल-गाेल फिरत असते. या डिस्कमध्ये ब्लॅक हाेलच्या आजूबाजूला अनेक मटेरियल्स पडतात.खगाेल शास्त्रज्ञांनी जाे प्रकाश पाहिला आहे ताे पहिल्या ब्लॅकहाेलच्या मागच्या बाजूचा मटेरियल्सचा असल्याचेही खगाेल शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.