अयाेध्येत माहेश्वरी भवनासाठी जागा देण्याची शाम साेनी यांची मागणी

    02-Aug-2021
Total Views |
 

ayodhya_1  H x  
 
 
अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम साेनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन काेठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अयाेध्येत माहेश्वरी भवन बांधण्यासाठी जागेची मागणी केली. या वेळी केद्रीय मंत्री गजेंद्र सिंग उपस्थित हाेते. या शिष्टमंडळात भिलवाडाचे खासदार सुभाष बहेडिया, समाजाचे अर्थमंत्री संदीप काबरा, जाेधपूरचे माजी महापाैर देवेंद्र सालेचा, कुमार लखाेटिया यांचा समावेश हाेता.