कमी सभासद असलेल्या सह. संस्थांना वार्षिक सभेची परवानगी

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 सहकार विभागाचे आदेश : काेराेनाचे नियम पाळून सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस मंजुरी
 

AGM_1  H x W: 0 
 
राज्यात काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास परवानगी देण्यात आली हाेती. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययाेजना करुन आता 50पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी असल्याचे आदेश सहकार विभागाने निर्गमित केले आहेत. 50 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी.संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सभेची तारीख, वेळ, ठिकाण व ऑनलाइन लिंकबाबतची माहिती किमान सात दिवस आधी एसएमएस, मेल, व्हाॅट्सअ‍ॅपद्वारे कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
वार्षिक सर्वसाधारण सभेची नाेटीस संस्थेच्या नाेटीस बाेर्डवर, संस्थेच्या शाखांच्या कार्यालयांत लावण्यात यावीत. तसेच, ज्या सभासदांचे ई मेल, पत्ता किंवा संपर्कासाठी माेबाईल क्रमांक नसेल, अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणाऱ्या विषयांबाबतची माहिती सात दिवसांत पत्राद्वारे पाेहाेच करावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेऊन, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात द्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेतील सदस्यांच्या उपस्थितीबाबत याेग्य नाेंद ठेवून सभेबाबतचे अभिलेख प्रचलित तरतुदीनुसार जतन करावेत. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकाेरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सभा घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी. हा शासन आदेशशासनाच्याwww.maharashtra.gov.संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.