खेळाची आवड; पण भारतीयांसमाेर समस्या

18 Aug 2021 13:02:47
 
डब्ल्यूइएफ-इप्साेस’चे सर्वेक्षण : वेळ आणि जाेडीदाराचा अभाव या मुख्य अडचणी
 

sports_1  H x W 
 
खेळाची आवड असलेल्या भारतीयांना आवड पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. ‘डब्ल्यूइएफ- इप्साेस’च्या एका सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे.विरंगुळा आणि व्यायाम म्हणून काहीतरी खेळ खेळणे शारीरिक तंदुरुस्तीसाठी गरजेचे असते आणि अनेक भारतीयांना काेणता ना काेणता खेळ खेळायला आवडते. पण, त्यासाठी वेळ आणि जाेडीदार यांची कमतरता या दाेन मुख्य समस्या असल्याचे या सर्वेक्षणात आढळले. अतिउष्ण किंवा अतिथंड हवामान आणि घरापासून लांब असलेली मैदाने या दाेन समस्यासुद्धा आहेत. काेराेनामुळे लागू झालेल्या लाॅकडाउन आणि निर्बंधांचा फटकाही क्रीडा क्षेत्राला बसल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.भारतात शहरी लाेकसंख्या वाढत असल्यामुळे खेळांची पसंतीसुद्धा बदलते ’ आहे. सायकलिंग (31 टक्के), धावणे (28 टक्के), फिटनेस (23 टक्के), पाेहणे (13 टक्के) आणि फूटबाॅल (9 टक्के) हे सध्या भारतीयांचे आवडीचे खेळ झाले असून, ही आकडेवारी एक आठवड्याची आहे. 
 
जागतिक पातळीवर विचार केला, तर धावणे आणि फिटनेसला समान; म्हणजे वीस टक्के पसंती असल्याचे या सर्वेक्षणात दिसूनआले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेले 70 टक्के जागतिक आणि 81 टक्के शहरी भारतीय सध्याच्या जीवनशैलीवर समाधानी आहेत. जागतिक पातळी पाहिली, तर सध्याच्या जीवनशैलीबाबत सर्वाधिक समाधानी नागरिक साैदी अरेबियात (91 टक्के) आहेत. पाठाेपाठ चीन (90 टक्के), नेदरलँड्स (85 टक्के) आणि अमेरिका (83 टक्के) यांचे क्रमांक आहेत.सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळे लाेकांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटले असल्यामुळे ते खेळांकडे वळत आहेत.त्यातूनच सायकलिंग, धावणे, चालणे आणि तंदुरुस्तीच्या व्यायामांचे प्रमाण वाढले आहे,’ असे मत ‘इप्साेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अडारकर यांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0