अमेरिकेतील जेम्स रिचर्ड शिन याची चित्तरकथा
बरेच चाेर साेने, चांदी, माैल्यवान, ऐतिहासिक दुर्मिळ वस्तुंची चाेरी करून काेट्यधीश झालेले तुम्ही पाहिले असतील.तस्कर मादक द्रव्यापासून तर मानवप्राण्यांची तस्करी करूनही अनेक तस्कर काेट्यधीश झालेले पाहिले असतील. पण अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यातील अॅलेन्टाऊन शहराचा रहिवासी जेम्स रिचर्ड शिन नावाचा चाेर चक्क पुस्तके चाेरून काेट्यधीश बनला हाेता.जेम्स रिचर्ड शिनचा जन्म अमेरिकेच्या इंडियाना प्रांतातील एका गावात 25 ऑक्टाेबर 1936 राेजी झाला हाेता आणि 2005 मध्ये जेम्सचा मृत्यू झाला. वयाच्या 16 व्या वर्षी जेम्स लाॅसएंजेलीस येथे पळून गेला हाेता. पण काही दिवसातच इंडियानाला परत आला. जेम्स 30-40 वर्षांचा हाेईपर्यंत ताे अट्टल चाेर बनला हाेता. पण यानंतर जेम्सने दागिने, पैसे किंवा माैल्यवान वस्तुंची चाेरी करणे साेडून दिले व ताे दुर्मिळ पुस्तके व तिकिटांची चाेरी करू लागला. पुस्तकांची पहिली चाेरी जेम्सने डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत अलेन्टाऊनमध्ये मुहलेनबर्ग काॅलेजच्या हेस लायब्ररीतील महाग, दुर्लभ पुस्तके चाेरली.
जेम्सला पुस्तकांचा इतिहास रिस्टाेरेशन आणि बाईंडिंगचे चांगले ज्ञान हाेते. पुस्तकांची चाेरी करण्यासाठी ताे आधुनिक टेक्नाॅलाॅजीचा वापर करीत असे. त्याने जगातील अनेक प्रख्यात लायब्ररीमधून सुमारे 5 लाख डाॅलर्स किमतीपेक्षा जास्त किमतीची पुस्तके चाेरली हाेती.जेम्सची पुस्तके चाेरण्याची पद्धत इतकी सफाईदार हाेती की, त्याच्या चाेरी करण्याच्या पॅटर्नने पाेलीस आणि डिटेक्टिव्ह सुद्धा चकित झाले. पण एक दिवस पुस्तक चाेरताना असिस्टंट लायब्रेरियन डेनिसफिलिप्सने जेम्सला रंगेहाथ पकडले व सिक्युरिटी गार्डच्या स्वाधीन केले. सिक्युरिटी गार्डने एफबीआयला कळविले. स्थानिक पाेलिसांनी जेम्सला ताब्यात घेतले. पण सिगरेट ओढण्याचा बहाणा करून जेम्स पाेलिसांच्या हातातून निसटला. पण पळून जात असताना त्याच्या खिशातून एक बिल खाली पडले आणि पाेलीस त्याच्यापर्यंत पाेहाेचले व त्याला पुन्हा अटक केली. पाेलिसांनी जेम्सच्या खाेलीची झडती घेतली त्यावेळी त्याच्या खाेलीत पुस्तक संदर्भातील अनेक वस्तू आणि बुट पाॅलिशच्या वेगवेगळ्या रंगाच्या डब्या सापडल्या. या बुट पाॅलिशचा वापर जेम्स पुस्तकांवरील शिक्के पुसण्यासाठी करीत असे. त्यामुळे जेम्सने पुस्तक काेणत्या लायब्ररीतून चाेरले हे कळत नसे.
यापूर्वी एप्रिल 1989 मध्ये जेम्सचा फोटाे वर्तमानपत्रात छापून आला हाेता.1989 मध्ये ओंबर्लिन काॅलेजच्या लायब्ररीत माैल्यवान पुस्तके चाेरत असतानाफिलिप माेफ्टे नावाच्या इसमाने जेम्स शिनला पकडले. त्याची 29 एप्रिल 1989 राेजी जामिनावर सुटका झाली.यानंतर जेम्स अचानक बेपत्ता झाला. अमेरिकेच्या मिसुरी राज्यात जेम्सचा टाेलेजंग बंगला हाेता.पण ताे कधीही त्या बंगल्यात राहिला नाही.त्याची पत्नी लाेला हिला साेबत घेऊन ताे पुस्तके शाेधतफिरत असे. आपला पती पुस्तके चाेरताे.याचा लाेलाला थाेडा सुद्धा खेद वाटला नाही.उलट तिने जेम्सला पुस्तके चाेरण्यासाठी मदतच केली. जेम्सचे खास वैशिष्ट्य असे की, ताे 300 डाॅलर्सपेक्षा कमी किमतीचे पुस्तक चाेरत नसे. 15 जानेवारी 1982 राेजी बेथलहॅम येथे पाेलिसांनी 400 पुस्तके जप्त केली. ही सर्व पुस्तके जेम्सनेच चाेरली हाेती. या पुस्तकांची किंमत त्या काळात अंदाजे 5 लाख डाॅलर हाेती. 20 जुलै 1982 राेजी त्याच्यावर पुस्तक चाेरीचा आराेप सिद्ध व त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. 9 ऑगस्ट 1995 मध्ये जेम्स पॅराेलवर सुटला. पण त्यानंतर त्याने कधीही चाेरी केली नाही. त्याने 24,000 पुस्तके चाेरली.