आता ट्विटरही ऑनलाइन विक्रीचे माध्यम

31 Jul 2021 13:47:26
 
 

twitter _1  H x 
मायक्राेब्लाॅगिंग साईट ट्विटरकडून आता जगातील नामांकित ब्रॅण्डशी सहकार्य करून ग्राहकांना त्यांची उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यावरून आगामी काळात साेशल मीडिया खरेदी विक्रीच्या पारंपरिक माध्यमांना कसा पर्याय ठरणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या ट्विटरवरील शाॅप सेवा केवळ अमेरिकेपुरती मर्यादित आहे.कालांतराने ती जगभर उपलब्ध केली जाणार आहे. कंपनीशी संबंधित प्राेफाइल पेज बघून ग्राहक थेट उत्पादन खरेदी करू शकणार आहे. पेमेंट पेजवर जाऊन पैसे भरले की संबंधित वस्तू घरी कधी पाेचणार याची माहिती लगेच मिळणार आहे. 2015पासून ट्विटरचे हे प्रयत्न सुरु आहेत. आता त्याला यश येते आहे.
Powered By Sangraha 9.0