मध्यप्रदेशातील एकमेव संस्कृत कन्या निवासी शाळा; आयुर्वेदाचेही शिक्षण संस्कृतमध्ये

    31-Jul-2021
Total Views |
 
 
30 जागांसाठी 120 ची वेटिंग लिस्ट; सहाव्या इयत्तेत प्रवेश परीक्षेद्वारा दिली जाते अ‍ॅडमिशन
 
 
 
school_1  H x W
 
स्मार्ट ब्लॅकबाेर्ड, ट्रायपाॅडवर लावलेला अँड्राॅईड माेबाइल फाेन इंटरनेटद्वारे कनेक्टेड प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थिंनी लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये प्रवेश घेत आहेत. खणखणीत आवाजात संस्कृतमध्ये शिक्षिका शिकविते.हे दृश्य एखाद्या खाजगी शाळेचे नाही, तर भाेपाळच्या बरखेडी येथील संस्कृत शाळेचे आहे. संपूर्ण मध्य प्रदेशात हे संस्कृतचे एकमेव गर्ल्स रेसिडेन्शियल स्कूल आहे. जेथे 30 जागांसाठी 120 ची वेटिंग लिस्ट आहे.जनरल कॅटेगरीचा कट ऑफ 78 ट्न्नयांवर पाेहाेचला आहे. संस्कृत बाेर्डाशी संलग्न महर्षि पतंजलि संस्थान या शाळेचे संचालन करते. इमारत पाहून ही सरकारी शाळा आहे, असे वाटत नाही. येथे विज्ञान प्रयाेगशाळासुद्धा आहे. स्कूल बाेर्डाचे चेअरमन भरत बैरागी यांनी सांगितले की, येथे आठवी ते बारावी इयत्तेपर्यंत शिकविले जाते.या सर्व इयत्तांच्या सिलॅबसमध्ये संस्कृत भाषेच्या तीनतीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
 
या शिवाय या सिलॅबसमध्ये संस्कृत साेबतच गणित आणि विज्ञान हे विषय हिंदी आणि इंग्रजीत शिकविले जातात. त्यात वैदिक गणित, वास्तुशास्त्र आणि प्राचीन ज्ञानाशी संबंधित विषयांचा समावेश आहे.ड्राॅप घेऊन घेतात प्रवेश:शाळेत 6व्या इयत्तेत प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाताे. यासाठी जिल्हा पातळीवर केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या शाळेच्या प्राचार्य रत्ना वाधवानी यांनी सांगितले की, बेगमगंजची कनिष्का गुर्जर नावाची मुलगी गेल्यावर्षी पाचवी उत्तीर्ण झाली. 6व्या इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी परीक्षा दिली. पण, नापास झाली. तिने ड्राॅप घेऊन पुन्हा तयारी केली व तिला प्रवेश मिळाला.भाेपाळ शहरातील गुफामंदिर परिसरातील संस्कृत महाविद्यालय परिसरात एक संस्कृत कन्या शाळा आहे.शिवाजीनगर येथील सराेजिनी नायडू गर्ल्स स्कूलमध्येसुद्धा संस्कृतच्या प्रथमा, द्वितीया म्हणजे एल केजी, यु केजी, अंकुर, उदय हे वर्ग सुरू आहेत. बागसेवनियामध्ये संस्कृत संस्थानम आहे. हे संस्कृतचे केंद्रीय विद्यापीठ आहे.