भविष्यात पाच काेटी लाेकांवरही पाळत ठेवली जाईल: स्नाेडेन यांचा इशारा

    31-Jul-2021
Total Views |
 
 
 स्पायवेअरच्या व्यापारावर बंदी आणण्याची गरज व्यक्त
 

pegasus_1  H x  
 
‘पेगॅससच्या माध्यमातून सध्या पन्नास हजार लाेकांवर पाळत ठेवली जात असली, तरी भविष्यात पाच काेटी लाेकांवरही पाळत ठेवली जाऊ शकते,’ असे मत ‘सीआयए’चे माजी काॅम्प्युटर तज्ज्ञ एडवर्ड स्नाेडेन यांनी व्यक्त केले. ‘द गर्डियन’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही श्नयता वर्तविली.इस्राईलच्या ‘एनएसओ’ या कंपनीने तयार केलेल्या ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून जगभरातील राजकीय नेते, न्यायाधीश, वकील, कंपन्यांचे प्रमुख, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात असल्याचे प्रकरण सध्या गाजत असून, त्यावर स्नाेडेन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्थाकडून लाेकांवर कशी गुप्त पाळत ठेवली जाते, याची माहिती त्यांनी 2013मध्ये प्रसिद्ध केली हाेती. पाळत ठेवणे त्वरित राेखायला हवे, असे ते म्हणतात.
 
‘पाळत ठेवण्याचे प्रमाण भविष्यकाळात अपेक्षेपेक्षा जास्त वाढत जाईल. सध्या सरकारपुरस्कृत हॅकर्सपासून काेणताही माेबाइलफाेन सुरक्षित नाही. स्पायवेअरच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर सरकारांनी बंदी घालायला हवी. अण्वस्त्रांच्या व्यापाराला असलेल्या बंदीप्रमाणे ही बंदी असावी,’ असे स्नाेडेन यांनी सांगितले. कमर्शिअल मालवेअरमुळे सरकारला पाळत ठेवण्याची साेय झाल्याचे ‘पेगॅसस प्राेज्नट’मुळे सिद्ध झाले आहे. या प्राेजे्नटद्वारे जास्तीत जास्त लाेकांवर पाळत ठेवली गेली आहे. त्यात पाेलिसांना पारंपरिक पद्धतीने काेणाचा फाेन रेकाॅर्ड करण्याची गरज पडली नाही आणि संबंधित संस्थांना काेणाच्या घरावर छापा घालण्याची आवश्यकता भासली नाही. कमर्शिअल स्पायवेअरद्वारे पाळत ठेवण्यात खर्च आणि जाेखीम कमी हाेऊन दूरूनच नजर ठेवणे श्नय झाले. त्यामुळे पाळत ठेवण्याच्या या तंत्रावर बंदी आणणे अत्यावश्यक आहे. तसे झाले नाही, तर किरकाेळ बाबींसाठीसुद्धा त्याचा वापर हाेण्याचा धाेका असल्याचे स्नाेडेन यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.