नववधूचा लेहंगा चक्क 100 किलाेचा !

    31-Jul-2021
Total Views |
 
 

marriage_1  H x 
 
प्रत्येकाला आपल्या लग्नाचा दिवस हा खास साजरा करायचा असताे. हा दिवस खास करण्यासाठी नववधू लग्नातील कपडे हटके निवडते. लग्नाच्या कपड्यांसाठी खास डिझाइन, कलर आणि एम्ब्राॅयडरी असे लेहंगे घालणं पसंत करतात. असाच एका नववधूचा लेहंगा साेशल मीडियावर चर्चेत आहे. या नववधूने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या लेहंग्याकडे वेधून घेतलं आहे.पाकिस्तानच्या या नववधूने एक दाेन किलाे नाही, तर तब्बल 100 किलाेचा लेहंगा घातला आहे. याचा व्हिडिओ आणि फाेटाे साेशल मीडियावर फाेटाे व्हायरल झाला आहे.या नववधूने लग्नाला लाल रंगाचा लेहंगा घातला आहे.या रंगाच्या लेहंग्यात नववधू अतिशय सुंदर दिसत आहे.
 
यावर रिच क्रिस्टल अँड सिल्व्हर सीक्वेंस व थ्रेड वर्कदेखील करण्यात आलं आहे. या लेहंग्याचा व्हिडिओ व्हायरल हाेण्यामागचं कारण म्हणजे त्याची टेल डिझाइन. या लेहंग्याची उंची फार आहे. या पाेर्शनला देखील एम्ब्राॅयडरी केली आहे. रिपाेर्टसनुसार, लेहंग्याची टेल डिझाइन आणि वर्कमुळे याचं वजन 100 किलाे आहे. साेशल मीडियावर हा लेहंगा पाहून सगळ्यांनाच माेठा धक्का बसला आहे.अनेकांना प्रश्न पडला की, या लेहंग्यात नववधूने वाॅक केला आहे का? हा लेहंगा घातल्यानंतर अनेकांना अभिनेता प्रियंका चाेप्राच्या लग्नातील सफेद रंगाचा गाऊन आठवला.प्रियंकाच्या लेहंगाची लांबी अतिशय लांब हाेती.