आइस्क्रिमचा एक स्कूप 60 हजार रुपयांचा!

    31-Jul-2021
Total Views |
 
जगातील सर्वांत महाग ‘ब्लॅक डायमण्ड’मध्ये असतात साेन्याचे कण, केशर आणि ब्लॅक ट्रफल
 
 
 
ice cream_1  H
आइस्क्रिमच्या एका स्कूपसाठी किती पैसे माेजण्याची तुमची तयारी आहे? दहा हजार, वीस हजार? पण थांबा... जगातील सर्वांत महाग आइस्क्रिम हवे असेल, तर एका स्कूपला साठ हजार रुपये देण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल! तुम्ही वाचता आहात ते अगदी खरे आहे यावर विश्वास ठेवा. आजवर तुम्ही जगातील सर्वांत महाग बिर्याणी, फ्रेंच फ्राइज आणि अगदी काॅफीबाबतही वाचले असेल; पण यात आता आइस्क्रिमचासुद्धा समावेश झाला आहे. साेन्याच्या एखाद्या दागिन्यांपेक्षाही महाग असलेले हे ‘ब्लॅकडायमण्ड’ नावाचे आइस्क्रिम असून, त्यात 23 कॅरेटच्या साेन्याच्या कणांचा वापर करण्यात आल्याने त्याच्या स्कूपला साठ हजार रुपये (800 डाॅलर किंवा तीन हजार दिऱ्हॅम) एवढे मूल्य द्यावे लागते. आता तुम्हाला प्रश्न पडाल असेल, हे आइस्क्रिम काेठे मिळते हा. त्यासाठी तुम्हाला दुबईला जाऊन त्याचा आस्वाद घेता येईल.
 
नेहमीच्या व्हॅनिला स्वादातील या ‘ब्लॅक डायमण्ड’ आइस्क्रिमच्या टाॅपवर 23 कॅरेटच्या साेन्याचे कण, केशर आणि काळ्या रंगाच्या भूमिगत आळंबीची (ब्लॅक ट्रफल) पखरण केलेली असते. ‘डायमण्ड ऑफ गॅस्ट्राेनाॅमी’ असा या अळिंब्यांचा उल्लेख केला जाताे. दुबईतील जुमेरिया रस्त्यावरील ‘स्कूपी कॅफे’मध्ये मिळणारे हे आइस्क्रिम एका खास बाउलमधून दिले जाते आणि ते खाण्यासाठी साेबत चांदीचा चमचासुद्धा असताे.भारतीय अभिनेत्री आणि ट्रॅव्हल व्लाेगर शहनाझ ट्रेझरीवाला यांनी ‘स्कूपी कॅफे’मध्ये जाऊन या आइस्क्रिमचा आस्वाद घेतला आणि त्याचा व्हिडिओ शेअर केल्यापासून ‘ब्लॅक डायमण्ड’ला मागणी वाढली आहे.‘स्कूपी कॅफे’मध्ये अन्य प्रकारची स्वादिष्ट आइस्क्रिमसुद्धा मिळतात. शिवाय येथील साेन्याची पाने घातलेली काॅफीसुद्धा पिऊन पाहता येईल. यात काॅफीच्या कपात 23 कॅरेटची साेन्याची पाने घातलेली असतात. मात्र, या काॅफीची किंमत समजलेली नाही