तापात झटके येणं सामान्य आहे

    31-Jul-2021
Total Views |
 
 

fever_1  H x W: 
 
अनेकदा तीव्र तापामुळे मुलांना झटके येतात.यामुळे मुलांचे डाेळेही फिरतात. हा झटक्यांचा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे. हे झटके सहा महिन्यांच्या बाळापासून ते पाच वर्षांच्या मुलांपर्यंत तापाबराेबर येणं सामान्य आहे. हे झटके संपूर्ण शरीराला येतात.
तापाच्या पहिल्या दाेन दिवसांत आणि चाेवीस तासांतून एकदा हे झटके येतात. हे झटके पंधरा मिनिटांहून जास्त नसतात. या झटक्यांनंतर बेशुद्धपणा किंवा पक्षाघाताचा झटका येत नाही. मूल काही वेळातच सामान्य हाेते. या झटक्यांमुळे मुलाचं काहीच नुकसान हाेत नाही, तसंच यासाठी मुलांना दीर्घकाळ औषधं घेण्याची गरजही नसते.