शवगृहातील मदतनीसांच्या 6 जागांसाठी 8 हजार अर्ज

31 Jul 2021 13:54:25
 
 
 

application_1   
 
बंगालची राजधानी काेलकाता शहरातील एका हाॅस्पिटलच्या शवगृहात मृतदेहांची व्यवस्था करण्यासाठी मदतनीसाच्या 6 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असता चक्क 6 पदांसाठी 8000 अर्ज मिळाले.आश्चर्य असे की, या अर्जदारांमध्ये इंजिनीअर, पाेस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट उमेदवारांचाही समावेश हाेता.या पदासाठी पात्रता कमीत कमी 8 वी उत्तीर्ण आणि वयाची अट 18 ते 42 वर्ष ठेवण्यात आली हाेती.उपराेक्त पदासाठी 1 ऑगस्ट 2021 ला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदासाठी दरमहा वेतन फक्त 15000 रु. आहे. नीलरतन सरकार मेडिकल काॅलेज हाॅस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जदारांमध्ये 100 इंजिनीअर, 500 पाेस्ट ग्रॅज्युएट आणि 2,200 पदवीधरांचे अर्ज आहेत.
 
यापैकी 784 अर्जदारांना लेखी परीक्षेसाठी बाेलावण्यात आले असून त्यात 84 महिलांचाही समावेश आहे.शवगृहाच्या नाेकरीसाठी उच्चशिक्षित लाेकांचे अर्ज येणे ही आमच्यासाठी आश्चर्यकारक तितकीच धक्कादायक बाब हाेती, असे या अधिकाऱ्याने मत व्यक्त केले. साधारणपणे स्मशानात अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्यांच्या घरातील लाेकच या पदांसाठी अर्ज करतात. पण बेकारी इतकी वाढली आहे की, उच्चशिक्षित लाेकांची शवगृहातही काम करण्याची तयारी आहे.
Powered By Sangraha 9.0