ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

    31-Jul-2021
Total Views |
 
हा पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेला सन्मान : आशा भाेसले यांच्याकडून भावना व्यक्त
 

Asha Bhosale_1   
 
 
महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले काैतुक आहे, अशा शब्दांत आशा भाेसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.राज्य शासनाचा 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भाेसले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.या वेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित हाेते. देशमुख यांनी आशा भाेसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भाेसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेल्या ‘लाेकराज्य’चा अंक भेट म्हणून दिला.
 
भारतरत्न लता मंगेशकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या आशा भाेसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवीशक्ती आहेत. त्यामुळेच आशा भाेसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासन राज्यात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून, यासाठी संगीतातल्या दिग्गजांची मदत घेतली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हा पुरस्कार येत्या ऑक्टाेबर किंवा नाेव्हेंबरमध्ये प्रदान करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, पण महाराष्ट्रभूषण वेगळा आहे. कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गाैरव आहे. हा पुरस्कार जाहीर हाेणे म्हणजे घरच्यांकडून माझे काैतुक झाले आहे, असे मी मानते. या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे.