देशातील शेतकऱ्यांवर 17 लाख काेटी रुपयांचे कर्ज

    30-Jul-2021
Total Views |
 
सध्या कर्जमाीची याेजना नाही; केंद्र सरकारचे संसदेमध्ये स्पष्टीकरण
 

loan_1  H x W:  
 
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेळाेवेळी नव्या नव्या याेजना जाहीर करते. दाेन वर्ष कर्ज माी करण्याचा गवगवा हाेता. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना करते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट हाेणे दूरच, पण देशातील शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाची रक्कम मात्र दुप्पट झाली आहे.नाबार्डने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील शेतकऱ्यावर एकूण 16.8 लाख काेटी रुपयांचे कर्ज आहे. पण सध्यातरी शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्याची काेणतीही ‘याेजना’ नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे. सर्वांत जास्त कर्जबाजारी शेतकरी तामिळनाडु, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या 5 राज्यात आहेत.तर सिक्किम, लडाख आणि मिझाेरामचे शेतकरी कमी कर्जबाजारी आहेत.
 
विशेष म्हणजे ही माहिती खुद्द केंद्र सरकारनेच संसदेमध्ये दिली आहे. एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किसनराव किराड यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची सध्या तरी काेणतीही याेजना नाही. शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाची ही रक्कम 31 मार्च 2021 पर्यंतची आहे. काही राज्य आणि केंद्र शासित राज्यातील शेतकऱ्यांवर कमी कर्ज आहे. केंद्र सरकारने हे कर्ज माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पण राज्य सरकार याबाबतीत स्वतंत्र निर्णय घेत आहे.पंजाब सरकारने भूमिहीन शेतमजुरांचे 590 काेटींचे कर्ज माफ करण्याची घाेषणा केली आहे. पंजाब सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचे 4,624 काेटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. तर केंद्र सरकारने 2014 मध्ये 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घाेषणा केली हाेती. पण ती हवेत विरली आहे.