जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी : राज्यपाल

30 Jul 2021 15:16:48
 
 चिपळूणमधील परिस्थितीची केली पाहणी
 
 

flood_1  H x W: 
 
अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट काेसळले आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येकनागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.चिपळूणमधील पूरस्थितीची राज्यपालांनी पाहणी केली. चिपळूणमध्ये व्यापारी, तसेच नागरिकांशी राज्यपालांनी संवाद साधला. तसेच, बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशिष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पाेलिस अधीक्षक माेहित कुमार गर्ग आदी उपस्थित हाेते.राज्यपालांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदत कार्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. चिपळूणमधील मदत कार्य असेच सुरू राहावे.प्रत्येक पूरग्रस्तास शासकीय मदत वेळेवर पाेहाेचवावी, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0