फिटनेस वाढविताना, हे लक्षात ठेवा...

    30-Jul-2021
Total Views |
 

exercise_1  H x 
 
आपण स्वतःलाफिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि जिममध्ये सकाळ-संध्याकाळ घाम गाळताे; पण अनेकदा आपल्याला हे समजत नाही की, आपण जाे व्यायाम करताेय, ताे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक. काही आवश्यक गाेष्टींची अंमलबजावणी केल्यानंतर आपण आपलाफिटनेस उत्तम बनवू शकताे...
 
झटपट वजन कमी करण्याच्या मागे लागू नका
 
झटपट वजन कमी करण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे नवे व्यायाम सांगितले जातात; पण अनेकदा अशाप्रकारचा व्यायाम आपल्याफिटनेससाठी हानिकारक ठरताे.
व्यायाम करण्यापूर्वी काही नियम ठरवा किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच व्यायाम करण्यास सुरुवात करा.
 
जाहिरातींवर विश्वास ठेवू नका
 
बहुतांश जाहिरातदार हा विश्वास देतात की, तुम्ही तीस दिवसांत तीस किलाे वजन कमी करू शकता आणि दहा मिनिटांच्या क्रंचेसनंतर सिक्स पॅक्स शरीर मिळवू शकता. यावर विश्वास ठेवण्यापूर्वी जाहिरातींची विश्वासार्हता लक्षात घ्या. या जाहिराती आपल्या शरीराशी खेळत नाहीत ना, हे बघा.
 
व्यायामावर नियंत्रण
 
गरजेपेक्षा जास्त व्यायाम करू नका. जर तुम्ही खूप जास्त कामं करत असाल, तर राेजच्या कामात काही बदल करा किंवा काही काळासाठी ती बंद करा. कारण चांगल्या आराेग्यासाठी शरीराचं संतुलन आणि आराम खूप आवश्यक आहे.
 
जिममध्ये जाण्यापूर्वी फिजिशियनचा सल्ला
 
व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्याफिजिशियनचा सल्ला अवश्य घ्या.
व्यायामादरम्यान काेणतीही दुखापत हाेऊ नये याकरिता व्यायामाचं तंत्र जाणून घ्या.
 
वर्जिशच्या वेळेस श्वासावर लक्ष
 
फिटनेसच्या वेळेस याेग्य पद्धतीने श्वास घेणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने श्वास घेण्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते.फिटनेसच्या वेळेस नाकाने श्वास घेण्याचा प्रयत्न करा आणि ताेंडाने श्वास बाहेर साेडा. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण हाेत नाही.
 
याेग्य वजन निवडणे
 
व्यायामादरम्यान याेग्य वजनाची निवड करा. व्यायामाची सुरुवात कमी वजनाने करायला हवी. हळूहळू वजन वाढवा. तज्ज्ञ तुम्हाला सांगतील की, कधी अधिक वजन उचलायचं आहे.