महिला व बालविकासच्या कर्मचाऱ्यांकडून बाल न्याय निधीला दाेन लाखांची देणगी

    29-Jul-2021
Total Views |
 
 
 
 
women_1  H x W:
 
बालकांसाठी स्थापित बाल न्याय निधीसाठी मंत्रालयातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकारीकर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने वर्गणी करुन जमा केलेल्या 2 लाख 5 हजार 500 रुपये रकमेचा धनादेश प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांच्या हस्ते महिला व बालविकास आयुक्त राहुल माेरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.मुलांचे कल्याण व पुनर्वसनासाठी आणि केंद्राच्या, राज्याच्या किंवा इतर काेणत्याही याेजनेत समाविष्ट नाहीत, अशा कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, अनाथ, निराधार, परित्यागीत अशा बालकांच्या माेठ्या आजारांवरील शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय सहायासाठी तरतूद, उद्याेजकताविषयक सहाय्य, काैशल्य विकास प्रशिक्षण किंवा व्यवसाय प्रशिक्षणासाठी तरतूद, बाल न्याय अधिनियमान्वये समावेश असलेल्या मुलांसाठी विशेष व्यावसायिक सेवा, समुपदेशक, अनुवादक, दुभाषी, विशेष शिक्षक, समाजसेवक, मानसिक आराेग्यसेवक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षकांची तरतूद करणे. या मुलांची सर्वंकश वाढ, विकास व कल्याणाकरिता सहाय्यभूत हाेण्यासाठी काेणताही इतर कार्यक्रम किंवा उपक्रम, बालकांसाठी कार्यरत संस्थांतील मुलांच्या कल्याणासाठी असलेल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना सहाय्य करणे आदींसाठी या निधीतून तरतूद करण्यात येते.