शाळा अर्धवट साेडलेल्या विद्यार्थ्यांसाठी काैशल्य विकास मंडळाचे 301 अभ्यासक्रम

    29-Jul-2021
Total Views |
 
 
संकेतस्थळ, बाेधचिन्हाचे मलिक यांच्या हस्ते अनावरण
 

skill_1  H x W: 
 
नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट साेडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या राज्य काैशल्य विकास मंडळाच्या 301 अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे. www. msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळाचे, तसेच मंडळाच्या बाेधचिन्हाचे नुकतेच काैशल्य विकास, राेजगार आणि उद्याेजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.मंडळाने नवीन अद्ययावत संकेतस्थळ विकसित केले आहे. औद्याेगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल आदींमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमात कालानुरूप सुधारणा, तसेच वाढ करून सद्यस्थितीत मंडळामार्फत 28 गटांतील 6 महिने, 1 वर्ष व 2 वर्षे कालावधीचे अंशकालीन व पूर्णवेळ स्वरूपाचे 301 अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत.अर्धवट शिक्षण साेडलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम चालवण्यात येतात.शाळा अर्धवट साेडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते वरदान ठरतात. या सर्व अभ्यासक्रमांची माहिती आता नव्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.इच्छुक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन काैशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळवावे, असे आवाहन मलिक यांनी केले.