तणावादरम्यान लहान मुलं हमखास दात खातात...

    29-Jul-2021
Total Views |
 

child_1  H x W: 
 
दात खाणं ही एक सामान्य समस्या आहे. लहान वयाच्या मुलांमध्ये ही समस्या हमखास दिसते की, झाेपेत ते दात खातात.कधीकधी ही समस्या माेठ्या मुलांमध्येही दिसते. अशावेळेस डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कधीकधी दातांच्या समस्येमुळेही असे हाेते.आपण दात खाताेय, हे मुलांना झाेपेत असल्यामुळे समजत नाही. त्यांच्या पालकांनाच या समस्येविषयी समजते. अशावेळेस जर आपण मुलाला उठवलं, तर असं जाणवतंही नाही की, काही क्षणांपूर्वी मुलाच्या दातातून आवाज येत हाेता; पण या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
 
कारणं : काही जणांचं असं मत असते की, मुलं दात खातात, कारण त्यांच्या पाेटात जंत झालेले आहेत; पण हे विज्ञान मानत नाही. मात्र तुम्ही मुलांना जंताचं औषध देऊ शकता. डाॅक्टरांच्या मते, मुलांना दर सहा महिन्यांनी डी वर्म करायला हवे. कधीकधी मानसिक तणावामुळेही मुलं असं करतात.हा तणाव काैटुंबिक, शाळेतील एखादी समस्या, अधिक कामाचं ओझं, मित्रांबराेबर भांडण कशाबाबतही असू शकताे.कधीकधी मुलं आपला राग त्यावेळेस व्यक्त न करता मनात ठेवतात.अशा मुलांनाही ही समस्या रात्री हाेऊ शकते. दातात छिद्र निर्माण हाेणे, दात व्यवस्थित आलेले नसणे, दातांचं फिलिंग याेग्य नसणे, यामुळेही काही मुलांना दात खाण्याची समस्या हाेऊ शकते.
 
सल्ला
 
रात्री मुलांना हवामानानुसार काेमट किंवा गार पाण्याने अंघाेळ घाला.ज्या मुलांचा स्वभाव जिज्ञासू आहे, त्यांची जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करा. अशा मुलांकडून दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम दरराेज करून घ्या.रात्री झाेपण्यापूर्वी मुलांना प्रेमाने भारलेलं वातावरण द्या.टीव्हीवर भांडण, लढाई असे कार्यक्रम बघू नका.डाॅक्टरी सल्ल्यानुसार, रात्री झाेपण्यापूर्वी दातांना रबर गार्ड लावा, ज्यामुळे दात सुरक्षित राहतील.जर मुलांच्या मनात काेणतीही भीती असेल, तर ती प्रेमाने बाेलून काढा.जर मुलं स्वतंत्र खाेलीत झाेपत असतील, तर त्यांना शांतपणे झाेपवून मगच तुम्ही तुमच्या खाेलीत झाेपायला जा.