जमशेदजी टाटा यांचे जन्मस्थळ नवसारीमध्ये बनविले संग्रहालय

    29-Jul-2021
Total Views |
 
 

Jamshedji tata_1 &nb 
 
भारतीय उद्याेगाचे पितामह आणि त्या शतकातील सर्वांत माेठे दानशूर जमशेदजी टाटा यांच्या बाबतीत बऱ्याच लाेकांना माहीत नाही की त्यांचा जन्म दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे झाला हाेता. ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला हाेता त्या घराला आता संग्रहालय बनविण्यात आले आहे.या संग्रहालयात टाटा कुटुंबाच्या वंशावळीपासून ते टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या प्रगतीची साक्ष असलेल्या वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. 3 मार्च 2014 राेजी त्यांच्या जयंतीनिमित्त हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 7 वर्षांत फ्नत 4,300 लाेकांनी या संग्रहालयाला भेट दिली. जून 2021 मध्ये तर फ्नत 30 लाेकांनीच या संग्रहालयाला भेट दिली. अशाप्रकारे हे संग्रहालय पाहण्याची उत्सुकता सरासरी एकाच व्य्नतीला आहे. मार्च 2020 मध्ये काेराेना आणि लाॅकडाऊनमुळे संग्रहालय पूर्णपणे बंद हाेते. या संग्रहालयात त्यांचा जन्म झालेली खाेली, टाटांची वंशावळ, फाेटाे, जुनी भांडी प्रदर्शित करण्यात आली आहेत.जमशेदजी यांचे 1904 साली जर्मनीत निधन झाले.