वजन कमी करण्यास आहार सप्लीमेंट उपयुक्त नाही

    28-Jul-2021
Total Views |
 
 

suppliments_1   
युराेपियन काँग्रेस ऑन ओबेसिटीत हा निष्कर्ष सादर केला गेला. विशेष म्हणजे 15% अमेरिकन वजन कमी करण्यासाठी या सप्लीमेंटवर अवलंबून आहेत. दुसरीकडे भारतीयांमध्ये स्थूलता वेगाने वाढत आहे. अशा वेळी आहाराच्या गाेळ्या-पावडर व वनस्पती व पशुउत्पादनांचे पेय पदार्थांची लाेकप्रियता वेगाने वाढत आहे. 16 वर्षांपर्यंत वजन घटवण्यासाठी पूरक औषधांच्या जागतिक समीक्षेतून कळते की, त्यांचा वापर याेग्य नव्हे.54 अध्ययनांची तपासणी झाली. ज्यामध्ये 4331 लाेक सामील हाेते. 2.5 कि.ग्रॅ. (5.5 एलबीएस) वजन घटवणे वैद्यकीय रुपात सार्थक मानले गेले.
 
समीक्षेनंतर दावा केला विश्लेषणात सामील हर्बल सप्लीमेंट्समध्ये ग्रीन टी, गार्सिनिया कँबाेगिया, मँगाेस्टाेन, व्हाइट किडनी बीन,  एफेद्रा, आि्रकन मँगाे व ईस्ट इंडियन थ्रिसल हाेती.संशाेधकांना आढळले की, यापैकी केवळ एका व्हाइट किडनी बीनने प्लेसबाेच्या तुलनेत 1.61 कि.ग्रॅ. (3.5 एलबीएस) पेक्षा जास्त वजन घटवले. ऑस्ट्रेलियात सिडनी विद्यापीठाचे प्राेेसर आणि अध्ययनाच्या प्रमुख लेखिका एरिका बेसेल म्हणतात की, या दिेशेने सध्या आणखी संशाेधन करण्याची गरज आहे.