गर्भारपण व्यवस्थित हाेण्यासाठी ही दक्षता घ्या...

28 Jul 2021 15:02:21
 

pregnancy_1  H  
ज्याप्रमाणे इमारत निर्मितीचे वेळी वास्तू दिशा लक्षात ठेवणे आवश्यक असते त्याप्रमाणेच गर्भवती महिलांसाठीही वास्तूच्या उपायांचे पालन करणे आवश्यक असते. ते उपाय खालीलप्रमाणेनवविवाहितांनी आपली बेडरूम घराच्या पश्चिम भागात बनवावी. या दिशेला असलेली बेडरूम दांपत्यसंबंध जिवंत, उत्साही व चिरस्थायी बनवून ठेवते. तसेच मनाजाेग्या संततीला जन्म देण्याची इच्छाही पूर्ण करते.प्रसूतीनंतर बाळ-बाळंतिणीला पश्चिम भागातच ठेवावे. गर्भवती महिलांनी उत्तर व पूर्वेकडील खाेल्यांमध्ये आराम वा झाेप घेणे टाळायला हवे.
 
गर्भवती महिलेने आपल्या बेडरूममध्ये ताज्या फुलांचा गुच्छ ठेवावा. जर मुलगी व्हावी असे वाटत असेल तर रूमच्या पश्चिम भिंतीलगत वा काेपऱ्यात ताज्या फुलांचे गुच्छ ठेवावे.गर्भवती महिलांनी अंधाऱ्या खाेलीत बसू नये. आपल्या बेडरूममध्ये उजेडाची पुरेशी व्यवस्था करावी.लाल, काळा, नारंगी व भडक रंगाचे कपडे घालणे गर्भवती महिलांनी टाळायला हवे.गर्भवती महिलेच्या बिछान्यासमाेर आरसा नसावा. काचेवर पडलेले किरण गर्भातील बाळाच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम करीत असतात.
Powered By Sangraha 9.0