मानवी आयुष्य 1000 वर्षे करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील

    28-Jul-2021
Total Views |
 
 

lifespan_1  H x 
 
भारतीय पाैराणिक आधारानुसार महर्षी नारद, हनुमान, अश्वत्थामा, परशुराम, व्यासांसहित 7 महापुरुषांना अमरत्वाचे वरदान मिळालेले आहे. या संदर्भात सखाेल अध्ययन करून अमेरिकेतील कॅलिाेर्निया येथील डाॅ. डी. गे्र यांनी स्थापन केलेल्या स्ट्रेटेजिक फॉर इंजिनीअर नॅग्लिजल सेनेसिन फाउंडेशन सन 2000 पासून मानवाचे सरासरी आयुष्य 1000 वर्षे करण्यासाठी संशाेधन करीत आहे.येत्या 10 वर्षांत म्हणजे 2030 पर्यंत 10 लाख लाेक शतायुषी हाेतील व त्यानंतर 25 वर्षांतच माणसाचे सरासरी आयुष्य 1000 वर्षे हाेईल, असा दृढविश्वास डाॅ. डी. ग्रे यांनी व्यक्त केला आहे. इतकेच नव्हेतर महाभारत युद्धात पराक्रम गाजविणारे पितामह भीष्म यांना इच्छामरणाचे वरदान मिळाले हाेते, तसेच इच्छामरण वरदान सामान्य माणसालाही मिळावे यासाठी डाॅ. ग्रे आणि त्यांचे फाउंडेशन प्रयत्नशील आहे. आपल्या शरीरातील जिन्स टीश्यूचा गुणाकार अडथळा न बनवता प्राेत्साहन देणारा ठरेल व माणसाची वृद्ध हाेण्याची प्रक्रिया कायमची बंद हाेऊन माणूस दीर्घायुषी हाेईल, असा डाॅ. ग्रे यांचा विचार आहे.
 
माणसाला म्हातारपण शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या पेशींमुळे येते. या पेशी शरीरातील कचरा बाहेर पडू देत नाहीत.
त्यामुळे शरीरात विविध प्रकारच्या त्रुटी निर्माण हाेतात. त्या दूर केल्यास माणसाला म्हातारपण येणार नाही व माणूस दीर्घायुषी हाेऊन मृत्यूपर्यंत तरुण राहील, असा डाॅ. ग्रे यांना विश्वास आहे. माणसाच्या शरीरातील वाढती चरबी आणि लठ्ठपणा माणसाला दीर्घायुषी बनविण्याच्या मार्गातील माेठा अडथळा आहेत. मानवी पेशीतील कचरा काढण्यात यश आले, तर शरीरात त्रुटी निर्माण हाेणार नाहीत व शरीर आपाेआप नवे स्वरूप धारण करील. म्हणजे माणूस म्हातारपणातही तरुण दिसेल. यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी, जिन थेरपी, स्टेमसेल थेरपीचा आधार घेऊन राेग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट करण्यात येणार आहे. शास्त्रज्ञांनी असेही शाेधून काढले आहे की, शरीराचा विकास आणि पतन याचा परस्पर काहीही संबंध नाही. कारण अमरत्वाची किल्ली आपल्याच शरीरातील जिन्समध्ये लपलेली असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.